खुशखबर! ‘या’ तारखेला येणार PM किसानचा 22 वा हप्ता. PM Kisan Samman Yojana Next Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ ही जीवनवाहिनी बनली आहे. या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ६,००० रुपये तीन हप्त्यांत (प्रत्येकी २,००० रुपये) जमा होतात. नुकतीच १९ नोव्हेंबरला २१वा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. आता सर्वांच्याच नजरा २२व्या हप्त्याकडे लागल्या आहेत.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा २२वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. ही तारीख केवळ माध्यमांतील अहवालांवर आधारित आहे, त्यामुळे शेवटची घोषणा होईपर्यंत काही बदल होऊ शकतो.
पण शेतकरी मित्रांनो गेल्या हप्त्यात दिसले की ज्यांची कागदपत्रे पूर्ण नव्हती, त्यांचा हप्ता थांबला होता. त्यामुळे २२वा हप्ता वेळेत मिळावा यासाठी आत्ताच ‘ही’ तीन कामे पूर्ण करा.
१ . ई केवायसी (e KYC) लगेच पूर्ण करा
२. शेतजमिनीची पडताळणी (Land Seeding) नीट करून घ्या
३. आधार कार्ड बँक खात्याशी आणि NPCI शी लिंक करा ही तीन कामे अपूर्ण असतील तर
आपली पात्रता आणि हप्त्याचा स्टेटस कसा पाहायचा?
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
‘Beneficiary Status’ वर क्लिक करा
आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबर टाका
लगेच तुम्हाला २२व्या हप्त्याची सद्यस्थिती दिसेल.
शेतकरी बंधूंनो २१वा हप्ता १९ नोव्हेंबरला आला, आता २२वा हप्ता फेब्रुवारी-मार्चमध्ये येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आजच आपली कागदपत्रे तपासा, ई केवायसी पूर्ण करा आणि पुढचा हप्ता वेळेत मिळवा