१ जानेवारीपासून लागू होणारे ३ महत्त्वाचे नियम!..लगेच जानून घ्या ; केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून १ जानेवारीपासून तीन महत्त्वाचे नियम लागू करण्यात येत आहेत. सध्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यात मिळणारे लाभ खंडित होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी ३१ डिसेंबरपूर्वी खाली नमूद केलेली कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. या नियमांचे वेळेत पालन न केल्यास दंड किंवा मिळणारे लाभ पूर्णपणे बंद होऊ शकतात.
वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य
सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. सर्व वाहनधारकांनी या मुदतीच्या आत आपल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवून घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. अर्ज करताना आरसी बुक, विमा, इंजिन आणि चेसी नंबर यांसारखी आवश्यक कागदपत्रे लागतील. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित वाहनधारकांना दंडाला सामोरे जावे लागेल.



















