अनुदानाचा दुसरा टप्पा येणार शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार ला 29 हजार कोटींचा प्रस्ताव.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रस्तावावरून काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला केंद्र सरकारने राज्याकडून प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले, ज्यामुळे राज्यातील खासदारांनी तीव्र आवाज उठवला. त्यानंतर राज्य सरकारने स्पष्ट केले की, मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.
ताज्या बातम्या
आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..!
ladki bahin hapta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर… पहा हप्त्याची तारीख.
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार.
मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना: कार्यपद्धती निश्चित, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
Satbara Utara : सातबारा उतारा वेगळा करायचाय, जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया




















